Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका अधिकाऱ्याची अशीही संवेदनशीलता...."साहेब...आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरू शकणार नाही..!"

एका अधिकाऱ्याची अशीही संवेदनशीलता...."साहेब...आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरू शकणार नाही..!"


वार- गुरूवार, दि.21 सप्टेंबर 2023.. वेळ- दुपारी 12 ची... स्थळ- ठाणे जिल्हा परिषद कार्यालयाचे आवार... मी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांची भेट घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेत आलो होतो. तेथून जात असताना कानावर शब्द पडले..."साहेब.. आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरू शकणार नाही.." आवाजातला आदरभाव ऐकून मी झटकन वळून पाहिले तर मला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ.  भाऊसाहेब कारेकर आणि एक दांपत्य एकमेकांशी बोलत होते. हे दांपत्य अपंग असल्याचे लक्षात आले. मीही त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे संभाषण ऐकू लागलो. त्या दांपत्याची शैक्षणिक समस्या होती, त्याबाबत मदतीसाठी ते जिल्हा परिषद कार्यालयात आले होते मात्र शिक्षणाधिकारी डॉ.कारेकर यांना ते शिक्षक दांपत्य अपंग असल्याचे माहीत असल्याने त्यांनी त्यांना खालीच थांबविले व ते स्वतःच त्यांची भेट घेण्यासाठी खाली आले. त्यांची समस्या व्यवस्थित समजून घेतली, आणि तात्काळ त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करून त्यांची समस्या सोडविली देखील.. 

  
 डॉ.कारेकर यांची ही संवेदनशीलता आणि कार्यतत्परता पाहून त्या अपंग दांपत्याचे हात आपोआप जोडले गेले होते आणि त्यांच्या तोंडून नकळत उद्गार आले... "साहेब.. आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरू शकणार नाही..!"
सर्वच अधिकाऱ्यांनी अशी संवेदनशीलता जपली तर प्रशासन प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही... चला तर मग संकल्प करूया.. डॉ.कारेकर यांच्यासारखी कार्यतत्परता आणि संवेदनशीलता आपणही आपल्या कामात आणूया...!

मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.