Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिला न्यायाधीशाला अटक; लाचलुचपतची कारवाई


महिला न्यायाधीशाला अटक; लाचलुचपतची कारवाई 


पुणे : न्यायाधीशाला मॅनेज करून तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० हजार रुपयांची लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केली. अर्चना दीपक जतकर (रा. मावळ) असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. न्यायालयाने जतकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणात यापूर्वीच निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव याला अटक केली आहे तर, शुभावरी भालचंद्र गायकवाड (२९) हिला जानेवारीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अर्चना जतकर यांना अटक करण्यात आली.


अर्चना जतकर आणि शुभावरी गायकवाड यांच्यात तब्बल १४७ वेळा संभाषण झाले आहे. फिर्यादी यांच्याविरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजूने काम करून देते, असे न्यायाधीश जतकर म्हणाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे संभाषण व्हॉइस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. गायकवाड हिने फिर्यादीप्रमाणेच आणखी ७ ते ८ जणांना जागेच्या वादासंदर्भात कोर्टातून निकाल लावून देण्यासाठी संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. है सर्व जमिनीच्या संदर्भातील वाद जतकर यांच्या कोर्टामध्येच सुरु आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.