Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावर्डेचा सुपुत्र बनतोय जिल्ह्यातील गरीब रुग्णांचा आधारवड.!

सावर्डेचा सुपुत्र बनतोय जिल्ह्यातील गरीब रुग्णांचा आधारवड.!    


जिल्ह्यातून शहरासारख्या ठिकाणी दवाखान्याच्या कामासाठी लोकं येत असतात,काहींना रक्त,दुर्मिळ पेशीची किंवा औषधाची गरज पडते तर काहींना सरकारी योजनेची पुरेसी माहिती नसते.पेशंट असल्यामुळे आणि परिस्थिती हलाखीची असले तर सोबतचे लोकही गोंधळून गेलेली असतात.अश्या अवस्थेत प्रत्येकाला कुणाच्यातरी आधाराची गरज भासते.सामाजिकतेची भावना असणारी बरीच मंडळी मदतही करत असतात,त्यातीलच सर्वत्र चर्चेत असणारी व्यक्ति म्हणजे सावर्डे गावचे व्यक्तिमत्व "मनोज भैय्या माने".

हे आलेल्या आणि मदत मागितलेल्या कोणत्याही पेशंट साठी सदैव धडपड करत असतात.जेवण खाण्यापासून,रक्त,पेशी,बिल कमी करणे,योजनेची माहिती देऊन त्यात मदत मिळवून देणे,अश्या गोष्टी पूर्ण ताकटीने आणि स्वतः च्या जीवावर करतात.स्वतः चा व्यवसाय आणि कुटुंब सांभाळत लोकांना कुठूनही मदत मिळवून आधार देण्याचे काम म्हणजे सोपी गोष्ट नसते.त्यांच्या याच गोष्टीची जिल्हाभर सतत चर्चा असते.निस्वार्थी समाजसेवा हाच धर्म मानतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.