Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, आठवीच्या मुलीच अक्षर पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर,  आठवीच्या मुलीच अक्षर पाहून तुम्हीही प्रेमात पडाल 


शालेय जीवनात बुद्धीमत्तेबरोबरच हस्ताक्षरालाही तितकंच महत्त्व असतं. वक्तृत्व, अभिनय, इत्यादी कलेप्रमाणे सुंदर हस्ताक्षर  असणं हीसुद्धा एक महत्त्वाची कला आहे.

मोत्यासारखे, वळणदार अक्षर असावं असं पूर्वी म्हटलं जात होतं. पण सध्याच्या डिजिटल युगात पाटी, पेन्सिल, पेनचा वापर कमी झाला आणि हस्ताक्षराचं महत्वही कमी झालं. पण या काळातही एका विद्यार्थिनीने आपल्या हस्ताक्षराने शाळेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विद्यार्थिनीच्या अक्षराला जगातील सुंदर हस्ताक्षराचा मान मिळाला आहे.

जगातील सुंदर हस्ताक्षर

या मुलीचं नाव आहे प्राक्रीती मल्ला . प्राक्रीती नेपाळची रहिवासी असून ती इयत्ता आठवीत शिकते. प्राक्रीतीने लिहिलेला पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तीने वेधलं. प्राक्रीतीचं हस्ताक्षर पाहून लोकं आश्चर्यचकित झाली. सोशल मीडियावर तीचं कौतुक केलं जात आहे.

2022 मध्ये नेपाळमधल्या संयुक्त अरब अमीरातच्या राजदूतांनी प्राक्रीती मल्लासंदर्भात एक ट्विट केलं होतं. यात म्हटलं होतं, नेपाळची तरुणी प्राक्रीती मल्ला हिला संयुक्त अरब अमीरातच्या 51 व्या स्पिरिट ऑफ द यूनियनच्या निमित्ताने जगातील सुंदर हस्ताक्षर पुरस्कारासाठी गौरवण्यात येतंय असं ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं. प्राक्रीती मल्ला ही नेपाळच्या सैनिकी शाळेत शिकते. तिच्या हस्ताक्षरासाठी नेपाळ सरकार आणि सेनेकडून प्रकृतीला पुरस्कारही देण्यात आला आहे. प्राक्रीती हिचं हस्ताक्षर कॉम्प्युटवर टाईप केलेल्या फॉन्टसारखं आहे. प्राक्रीतीचं हस्ताक्षर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप अशा सर्व सोशल साईटवर व्हायरल झालं असून हस्ताक्षर पाहून लोकं तिचं कौतुक करत आहेत.

प्राक्रीतीने सुंदर हस्ताक्षराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मोत्याच्या अक्षरांसारख्या सुंदर हस्ताक्षरासाठी प्राक्रीतीला देशात अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. अनेक जणांनी तिच्या हस्ताक्षराची तुलना कॅलिग्राफीशी केली आहे. सुंदर हस्ताक्षरासाठी प्राक्रीती दररोज दोन तास सराव करते असं तीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.