Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केळी आणि ' या' फळांचे सेवन ठरू शकतं घातक, एकत्र खाण्याची करू नका चूक

केळी आणि ' या'  फळांचे सेवन ठरू शकतं घातक, एकत्र खाण्याची करू नका चूक 


केळी हे एक फार हेल्दी फळ मानलं जातं. कारण याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण प्रत्येक फळ वेगळं असतं. काही फळं उष्ण असतात तर काही फळं थंड असतात. याच कारणाने वेगवेगळे गुणधर्म असलेली फळं एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

चला जाणून घेऊ केळीसोबत कोणतं फळ खाऊ नये.

केळीसोबत कधीच खाऊ नका पपई

केळी हृदय आणि पोटासाठी फायदेशीर असते. तेच पपई खाल्ल्यानेही डायजेशन चांगलं होतं आणि कोलेस्ट्रॉलही कमी होतं. पण हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, ही दोन्ही फळं एकत्र खाऊ नये. केळं थंड असतं आणि पपई उष्ण असते. ज्यामुळे यांचं सोबत सेवन केलं तर अपचन, उलटी, डोकेदुखी, मळमळ, गॅस, एलर्जी अशा समस्या होऊ शकतात.
कोणत्या स्थितीत पपई खाणं टाळावं

1) काही रिसर्चनुसार, अस्थमा किंवा श्वासासंबंधी इतर कोणती समस्या असेल तर पपई खाल्ल्याने एलर्जीचा सामाना करावा लागू शकतो. त्याशिवाय पिंपल्स आणि खाज येण्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे अशा रूग्णांनी पपई खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2) गर्भवती महिलांना पपई खायला देऊ नये. कारण पपई उष्ण असते. याने पोटातील बाळाला समस्या होऊ सकते.

3) हे खरं आहे की, पपईतील फायबरमुळे पोटाची समस्या दूर होते. पण प्रमाणापेक्षा जास्त फायबर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. 

4) जर तुम्ही रक्त पातळ करण्याची औषधं घेत असाल तर पपई खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण पपईनेही रक्त पातळ होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.