Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्रालयातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिनाभराच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

मंत्रालयातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिनाभराच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?


मंत्रालयातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. या अधिकाऱ्यांना महिनाभराचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये मदत आणि पुनर्वसन खात्याच्या सचिवांचा सहभाग आहे.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे या अधिकाऱ्यांना महागात पडलं आहे.

मदत आणि पुनर्वसन खात्याच्या सचिव असिम गुप्ता यांच्यासह विजयसिंग देशमुख, उत्तम पाटील, प्रविण साळुंखे, तलाठी सचिन काळे यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणामध्ये हायकोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. मात्र सरकारी पक्षाने माफी मागितल्यानंतर शिक्षेला आठवड्याची स्थगिती देण्यात आली आहे.  शिक्षा रद्द करण्यास नकार देत न्यायालयानं प्रतिज्ञापत्र मागवलं आहे. या प्रकरणी आता ८ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.