Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फक्त 9 लाखात घर, तेही मुंबईपासून.., तुम्हाला लागू शकते लॉटरी; कसं ते वाचाच?

फक्त 9 लाखात घर, तेही मुंबईपासून.., तुम्हाला लागू शकते लॉटरी; कसं ते वाचाच?


मुंबई : मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण मुंबईतील घराच्या किंमती ज्या पद्धतीने गगनाला भिडल्या आहेत, त्या पाहून घर घेण्याचं स्वप्नही कोणी पाहत नाहीत.

मुंबईत घर घेता येत नसल्याने मुंबईकरांना बदलापूर, कर्जत, पनवेल, वसई आणि विरारच्या दिशेने धाव घ्यावी लागत आहे. मात्र, आता मुंबईकरांचं घर घेण्याचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्हालाही आता तुमच्या बजेटमध्ये घर घेता येणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे. ती म्हणजे…

महाराष्ट्र हौसिंग अँड एरिया डेव्हल्पमेंट ऑथोरिटी अर्थात म्हाडा तुमच्या घरांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. म्हाडाने दुसऱ्यांदा 5311 घरांची लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. अत्यंत स्वस्तात घरे देण्याचा म्हाडाचा प्लॅन आहे.

7 नोव्हेंबरला लॉटरी

म्हाडाच्या कोकण बोर्डाकडून ही लॉटरी काढली जाणार आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासह मुंबईतील काही भागात ही 5311 घरे असणार आहे. यातील एक हजाराहून अधिक घरे पंतप्रधान आवास योजनेतून देण्यात येणार आहेत. या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर आहे. तर पेमेंट 18 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारला जाणार आहे. या घरांची लॉटरी 7 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.



या ठिकाणी आहेत घरे

म्हाडाची ही स्वस्तातील घरे वसई, विरार, टिटवाळा, ठाणे, कल्याण, मुंब्रा आदी ठिकाणी असणार आहेत. या घरांच्या किंमती 9 लाखांपासून ते 49 लाख रुपयांपर्यंत आहेत. म्हाडा यावेळी सर्वात स्वस्त घर 9.89 लाख रुपयात देणार आहे. 9.89 लाखाचं हे घर वसईत मिळणार आहे. तर सर्वात महागडं घर विरारमधील आहे. विरारमधील या घराची किंमत 49. 81 लाख रुपये आहे. घराच्या एरियाबद्दल सांगायचं तर सर्वात छोट्या घराचा एरिया 258 वर्ग फूट आहे. या स्किमचा लाभ उचलण्यासाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकता.

पुण्यातही घरांची विक्री

म्हाडाने मुंबई लॉटरी 2023नंतर नव्या स्किमची घोषणा केली आहे. 6 सप्टेंरब 2023ला त्याचं स्टार्टअप करण्यात आलं होतं. 27 सप्टेंबरपर्यंत याबाबतचा अर्ज करण्यात आला होता. पुणे बोर्डाने पुणे, सांगली आणि कोल्हापूरसाठी 5863 घरे देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 2445 घरे आधी या आणि घेऊन जा, या तत्त्वावर ही घरे दिली जात आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.