Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

9 कोटींच्यावर विकला गेला हा स्वेटर; यात इतक काय आहे खास ?

9 कोटींच्यावर विकला गेला हा स्वेटर; यात इतक काय आहे खास ?


नवी दिल्ली  : काही महिन्यातच थंडी सुरू होणार आहे आणि त्या मोसमात स्वेटरची मागणी झपाट्याने वाढते. स्वस्त आणि महागडे असे दोन्ही प्रकारचे स्वेटर बाजारात उपलब्ध असतात. पण तुम्ही कधी 9 कोटी रुपयांचा स्वेटर पाहिला आहे का?

अर्थात, ही किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण नुकताच एका लाल स्वेटरचा लिलाव झाला, ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. एकीकडे हा स्वेटर जुना आहे, दुसरीकडे तो अगदी सामान्य स्वेटरसारखा दिसतो, मग त्याची किंमत एवढी का? याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतोजरी हा स्वेटर जुना आणि सामान्य दिसत असला तरी तो ज्या व्यक्तीचा होता तो अजिबात सामान्य नव्हता.

खरं तर, एक वेळ होती जेव्हा या स्वेटरची मालकीन जगातील सर्वात प्रसिद्ध महिलांपैकी एक होती. हा स्वेटर ब्रिटनच्या माजी राजकुमारी डायनाचा आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची पत्नी आणि प्रिन्स हॅरी आणि विल्यम यांची आई लेडी डायना यांच्या या स्वेटरचा 9 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला आहे.एबीसी न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या स्वेटरची बोली गेल्या गुरुवारी संपली. त्याआधी सुमारे 2 आठवडे लोक त्यासाठी बोली लावत होते.




लिलाव करणार्‍या कंपनीने त्याच्या किंमतीचा अंदाज 41 लाख ते 66 लाख रुपये लावला होता. परंतु बोलीमध्ये त्याची किंमत वाढतच गेली. बोली संपण्यापूर्वी ते 1 कोटींहून अधिक रुपयांना विकलं जाणार होतं. परंतु काही वेळानंतर एका अज्ञात व्यक्तीने 9 कोटी रुपये ($1.1 दशलक्ष) बोली लावून हा स्वेटर खरेदी केला. 19 वर्षांच्या वयात प्रिन्सेस डायना पहिल्यांदा या स्वेटरमध्ये दिसल्या होत्याजून 1981 मध्ये, चार्ल्ससोबत तिच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर राजकुमारी डायना पोलो सामन्यात सहभागी झाली. तेव्हा ती 19 वर्षांची होती. त्यावेळी तिने तोच लाल स्वेटर परिधान केला होता. या फोटोंची इतकी चर्चा झाली की तिचा हा लाल स्वेटर स्टाईल स्टेटमेंट बनला आणि या डिझाइनचे स्वेटर खरेदी करण्याची जणू स्पर्धाच लागली. स्वेटरवर अनेक पांढऱ्या मेंढ्यांमध्ये एक काळी मेंढी आहे.

त्यावेळी लोकांचा असा अंदाज होता, की डायना या स्वेटरमधून आपण राजघराण्यात काळ्या मेंढीसारखं असल्याचं दाखवत होती.तिने 1996 मध्ये चार्ल्सशी घटस्फोट घेतला आणि 1997 मध्ये, जेव्हा ती फक्त 36 वर्षांची होती, तेव्हा पॅरिसमध्ये कार अपघातात तिचा मृत्यू झाला. डायनाची कोणती वस्तू इतक्या महागात विकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तिचा एक बॉलगाऊन 5 कोटींना विकला गेला होता. डायनाच्या या स्वेटरने सर्वात महागड्या स्वेटरचा लिलाव रेकॉर्ड मोडला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकन गायक-संगीतकार कर्ट कोबेन यांच्या स्वेटरच्या नावावर होता जो 2 कोटी रुपयांना विकला गेला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.