Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जालन्यात मराठा आरक्षण आदोलंना दरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज; झटापटीत 8 पोलिसासह अनेक जखमी


जालन्यातील शहागड येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांनावर पोलिसांनी लाठीमार केल्याची बातमी समोर येत आहे. पोलिसांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आरोप, आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

जन आक्रोश आंदोलनानंतरही राज्य सरकराने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्याने दोन दिवसांपासून जालन्यात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळल्यानंतर पोलिस त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, अशी प्राथमिक माहिती आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.