Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषद शाळेतील 8 वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकांकडून अमानुष मारहाण; तक्रार देण्यास पालकांची असमर्थता



आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावाच्या हद्दीतील कोळेकर वस्ती येथील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मात्र या घटनेबाबत पालकांनी मौन बाळगले आहे.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावाच्या हद्दीतील कोळेकर वस्ती येथील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मात्र या घटनेबाबत पालकांनी मौन बाळगले आहे.
शिक्षक बाबासाहेब शेख यांनी विद्यार्थिनीला अमानुषपणे मारहाण करून घरी सांगितले तर आणखी मारहाण केली जाईल, अशी विद्यार्थिनीला भीती घातल्याने विद्यार्थिनीने घरात काहीच सांगितले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यासाठी कपडे काढले असता हा प्रकार पालकांच्या लक्षात आला.

या प्रकाराबाबत पालकांनी प्रथम तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनचा रस्ता धरला होता. मात्र शिक्षकाने राजकीय वजन वापरून वरिष्ठ पातळीवरून गावातील प्रमुख मंडळींना मध्यस्थ करून या प्रकरणावर पडदा टाकण्यास पालकांना भाग पाडले होते. त्यामुळे या प्रकरणावर पालक बोलण्यास तयार नाहीत. याबाबत पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दोन विस्तार अधिकारी घटनेची चौकशी करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी पालकांकडून कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आल्याने मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

बाबासाहेब शेख या शिक्षकाकडून शाळेतील अन्यही मुलांना क्रूरपणे मारहाण केली जात असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळे अशा शिक्षकावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. लहान मुलांचे शोषण होऊ नये, त्यांच्या बरोबर क्रूरता होऊ नये, म्हणून अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. परंतु असे कायदे असताना सुद्धा लहान मुलांच्या सोबत क्रूरता होत असल्याचे समोर येत आहे.

सबंधित विभागाने सुद्धा घटनेची गंभीरता पाहून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अशा शिक्षकांना कायद्याची कोणतीही भीती नाही असे दिसून येत आहे. या घटनेबाबत शिक्षण विभाग काय भूमिका घेणार आहेत याकडे सर्व तालुक्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.