Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचे सरकार आल्यास 500 रुपयांत गॅस सिलिंडर

काँग्रेसचे सरकार आल्यास 500 रुपयांत गॅस सिलिंडर

तेलंगणात काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास महिलांना दर महिना 2500 रुपये, महिलांना बससेवा मोफत आणि गृहिणींना सिलिंडर फक्त 500 रुपये किमतीत उपलब्ध करून दिले जाईल, अशा मोठय़ा घोषणा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रविवारी केल्या. हैदराबादजवळील तुक्कूगुडा येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या.

जनतेसाठी काँग्रेस 6 गॅरंटीची घोषणा करीत आहे. तसेच घोषणा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही सोनिया यावेळी म्हणाल्या. तेलंगणात काँग्रेस सरकार आल्यास 'महालक्ष्मी योजने'अंतर्गत राज्यातील महिलांना दर महिना अडीच हजार रुपये दिले जातील, राज्य परिवहन बसमधून महिलांना मोफत प्रवास दिला जाईल. तसेच 500 रुपये किमतीत गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील, असे सोनिया म्हणाल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.