Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंधेरीत 4 कोटी रुपयांचे मॅफे ड्रॉन जप्त; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची कारवाई

अंधेरीत 4 कोटी रुपयांचे मॅफे ड्रॉन जप्त; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची कारवाई 


अंमली पदार्थाच्या वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरता मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतलीय. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर एमडी अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ४ कोटी ६ लाख ६० हजार किमतीचे एमडी हे अंमली पदार्थ जप्त केले. अर्शद अहमद मोबिन शेख, (वय २६) आणि इम्रान नूर मोहम्मद मेमन, (वय २६) अशी अटक करण्यात आल्यांची नावे आहे. हे दोघेही वसई येथील राहिवसी आहेत.

मुंबई गुन्हे शाखा पोलीस अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या मागावर होते. याप्रकरणी तपास कार्य करत असताना पोलिसांना डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जण मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेवून येणार आहेत, अशी माहिती कक्ष ९ गु.प्र.शा., गु.अ. वि. मुंबईचे प्रभारी पोलीस निरिक्षक दया नायक यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर कक्ष ९ च्या पथकाने महानगरपालिका उर्दु स्कुल, शाळा क्र. १०२ समोर सापळा रचला आणि दोन जणांना शिताफीने पकडलं. या दोघांकडे एमडी हे अंमली पदार्थ मिळाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण २ किलो ३३ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किमत सुमारे ४ कोटी ६ लाख ६० हजार रूपये एवढी आहे. पोलिसांनी २९ एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केलाय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.