Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क ! एक उंदीर पकडण्यासाठी रेल्वेने दिले चक्क 41 हजार रूपये

चक्क ! एक उंदीर पकडण्यासाठी रेल्वेने दिले चक्क 41 हजार रूपये 


रेल्वेच्या बोग्यांमध्ये मनसोक्त वावरणाऱ्या उंदरांच्या बंदोबस्तासाठी चक्क 69 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गंभीर म्हणजे, इतके पैसे खर्च करून गेल्या तीन वर्षांत फक्त 184 उंदीरच पकडण्यात आले आहेत. उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाचा हा खर्च माहिती अधिकारांतर्गत उघड झाला आहे. याचा हिशोब केल्यानंतर एक उंदीर पकडण्यासाठी सुमारे 41 हजार रुपये खर्च झाल्याचं दिसून येत आहे.

हे उंदीर पकडण्याचं कंत्राट सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनला देण्यात आलं होतं. कंपनीने उंदीर पकडण्याची योजना राबवली. गेल्या तीन वर्षांत म्हणजे 1095 दिवसांत अधिकाऱ्यांनी फक्त 186 उंदीर पकडले. म्हणजे एक उंदीर पकडण्यासाठी या कंपनीला सरासरी साडे सहा दिवसांचा अवधी लागला. 2020मध्ये या प्रकाराला सुरुवात झाली. त्यावर्षी अधिकाऱ्यांनी 83 उंदीर पकडले आणि त्याचा खर्च झाला 23.2 लाख रुपये.

त्याच्या पुढच्या वर्षी उंदरांची संख्या घटून निम्म्यावर आली. म्हणजे 2021मध्ये 45 उंदीर पकडण्यात आले. त्याचा खर्च प्रत्येक उंदरामागे 51 हजार इतका आला. 2022मध्ये 40 उंदीर पकडण्यात आले आणि त्यासाठी एका उंदरामागे 57 हजार 900 रुपये इतका खर्च आला. माहिती अधिकारात या प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही या प्रकारावर संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.