Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! वकिलाला कोठडीत दुसर्‍या व्यक्तीसोबत सेक्स करण्यास भाग पाडले, 3 पोलीसांना अटक

धक्कादायक! वकिलाला कोठडीत दुसर्‍या व्यक्तीसोबत सेक्स करण्यास भाग पाडले, 3 पोलीसांना अटक 


नवी दिल्ली : पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुक्तसर जिल्ह्यात एका वकिलाचा आणि कोठडीत असलेल्या अन्य एका व्यक्तीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली बुधवारी पोलीस अधीक्षक आणि अन्य दोन पोलिसांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, छळाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी लुधियानाचे पोलीस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरिक्त पोलीस महासंचालक (इंटेलिजन्स) या एसआयटीवर लक्ष ठेवतील आणि इतर तीन पोलीस त्याचे सदस्य असतील. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
सोमवारी एका वकिलाचा छळ केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांसह सहा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्तसर येथील एका वकिलाला त्याच्या सहआरोपीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास  भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

एफआयआरनुसार, मुक्तसरचे पोलीस अधीक्षक (तपास) रमणदीप सिंग भुल्लर, निरीक्षक रमन कुमार कंबोज, कॉन्स्टेबल हरबंस सिंग, भूपिंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग आणि होमगार्ड दारा सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक भुल्लर, निरीक्षक रमणकुमार कंबोज आणि कॉन्स्टेबल हरबंस सिंग यांना अटक करण्यात आली आहे. एसआयटी वकिलाने केलेल्या कोठडीतील छळाच्या आरोपाची चौकशी करेल आणि त्याचा अहवाल संचालक (इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) यांना सादर करणार आहे. पीडित वकिलांनी पोलिस पथकावर हल्ला करून अधिकाऱ्यांचे कपडे फाडले, अशी तक्रार रमन कुमार कंबोज यांनी केली होती. त्यानुसार संबंधित वकिलाला १४ सप्टेंबर रोजी अन्य एका व्यक्तीसह अटक करण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.