Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सातारा- पुणे महामार्गावर भीषण अपघात 3 जण जागीच ठार, जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढले

सातारा - पुणे महामार्गावर भीषण अपघात 3 जण जागीच ठार,  जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढले 

शिरवळ : सातारा - पुणे महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाजवळ टेम्पो व ट्रकचा भीषण अपघात झाला असून, त्यामध्ये तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झालेला आहे. मंजुनाथ यल्लाप्पा कावली (वय -२८, पामलदिनी, ता. गोकाक, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक), आंनद गुरुसिद्ध गंगाई (वय ३०, रा पामल दिनी, ता. गोकाक, जिल्हा बेळगाव. राज्य कर्नाटक), नायकप्पा सत्यप्पा नायकर (वय ३४, उज्जनकोप, ता. रामदुर्ग, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक) अशी मृत व्यक्तीची नावे असून, घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झालेली आहे.

बुधवार दि. १३ रोजी रात्री दहाच्या सुमारास सातारा- पुणे महामार्गावरील धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटे वस्ती समोर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून टेम्पोने जोराची धडक दिल्याने मालट्रकमधील ३ जण जागीचं ठार झाले. कर्नाटक बेंगलोर येथून शेतीचा माल मुंबई, वाशीकडे घेऊन जाणारा टेम्पो धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटे वस्ती समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रकला पाठीमागे जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे दबला गेला. यात मंजुनाथ यल्लाप्पा कावली, आंनद गुरुसिद्ध गंगाई, नायकप्पा सत्यप्पा नायकर पूर्णपणे दबले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत.



जेसीबीच्या साह्याने मृतदेह बाहेर

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिरवळ पोलीस स्टेशन, शिरवळ रेस्क्यू टीम, एस के फाउंडेशन व धनगरवाडी ग्रामस्थ व शिरवळ ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेल्या मृतदेह क्रेन जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यास मदत करण्यात आली.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

या अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु मृतदेह बाहेर काढल्यानंतर लगेचच वाहतूक महामार्ग पोलिसांच्या मार्फत सुरळीत करण्यात आली. पोलीस महासंचालक सुिनल फुलारी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.