येरवडा कारागृहातच कैद्याने घातला 27 लाखांचा गंडा
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातील मनी ऑर्डर रजिस्टरमध्ये न्याय विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या हुबेहूब सह्या आणि खोट्या नोंदी करून 27 लाख 69 हजार रुपयांचा अपहार केला.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सचिन रघुनाथ फुलसुंदर या कैद्याविरुद्ध फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुरुंगाधिकारी बापूराव भीमराव मोटे (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर 'ई-प्रिझन' सॉफ्टवेअरच्या साह्याने संगणकाने कामे करा, असा आदेश पोलिस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कारागृह प्रशासनाला दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.