Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रजनीकांत यांना मिळाले 210 कोटींचे मानधन

रजनीकांत यांना मिळाले 210 कोटींचे मानधन 


नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी 'जेलर' चित्रपटातील भूमिकेबद्दल एकूण २१० कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. 'सन पिक्चर्स' या निर्मिती संस्थेचे संचालक कलानिधी मारन यांनी रजनीकांत यांना १०० कोटींच्या मानधनाच्या धनादेशाचे पाकीट दिले. व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी 'एक्स' वर पोस्ट करून ही माहिती दिली. विशेष म्हणजे, रजनीकांत यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी यापूर्वीच ११० कोटींचे मानधन देण्यात आले होते. चित्रपटाने चांगली कमाई केल्याने त्यांना १०० कोटींचे हे अतिरिक्त मानधन मिळाले. 

त्यामुळे, रजनीकांत देशातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत, असेही विजयबालन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी मारन रजनीकांत यांना १०० कोटींचा धनादेश देत असल्याचे छायाचित्रही शेअर केले. 'जेलर' चित्रपटाच्या माध्यमातून दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलेल्या रजनीकांत यांचे चाहत्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे.

विजयबालन यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, की रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटाने जगभरात अवघ्या २२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ६२५ कोटींची कमाई करून मैलाचा दगड गाठला. आता हा चित्रपट ६५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

#jayshriram 🙏🙏
https://www.instagram.com/reel/CwraaZZIuBP/?igshid=YTUzYTFiZDMwYg==

पुढील चित्रपटाचे दिग्दर्शन मुलीचे

नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांनी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे, या चित्रपटात रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, जॅकी श्रॉफ, शिवराजकुमार, योगीबाबू आदींच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. रजनीकांत यानंतर 'लाल सलाम' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत असून त्यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांतने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.