Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" लोकसभेच्या निवडणूका 2024 नाही तर 2026 ला होणार, केंद्र सरकारचा मोठा प्लॅन "

" लोकसभेच्या निवडणूका 2024 नाही तर 2026 ला होणार,  केंद्र सरकारचा मोठा प्लॅन "


संसदेच्या विशेष अधिवेशनात काल केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केले आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या श्रेयवादावरून काल लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा गोंधळ बघायला मिळाला. महिला आरक्षण विधेयकावरून आता संसदेत चर्चा केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

संसदेचं विशेष अधिवेशन बोलवूनही महिला आरक्षण आता लागू न होता २०२६ नंतर लागू होणार असेल तर याचे दोनच अर्थ निघतात. एक म्हणजे, राज्य सरकारप्रमाणे बोलून मोकळ व्हायचं आणि निघून जायचं. अशा प्रकारे केंद्र सरकारचीही भावना असू शकते, किंवा दुसरं म्हणजे, लोकसभेच्या निवडणुका २०२६ पर्यंत पुढे ढकलून वन नेशन वन इलेक्शन च्या नावाखाली विधानसभा व लोकसभा एकत्र घेण्याचा विचार असू शकतो.

दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात जोरदार सुरूय. परंतु याला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे आगामी काही काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संसदेचं विशेष अधिवेशन बोलवूनही #महिला_आरक्षण आता लागू न होता 2026 नंतर लागू होणार असेल तर याचे दोनच अर्थ निघतात…

एक म्हणजे, राज्य सरकारप्रमाणे #बोलून_मोकळ_व्हायचं_आणि_निघून_जायचं अशा प्रकारे केंद्र सरकारचीही भावना असू शकते…
किंवा
दुसरं म्हणजे, लोकसभेच्या निवडणुका 2026…



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.