2000 हजारच्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली; या तारखेपर्यंत बँकेत भरता येणार
2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट आली होती. त्यानंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय १९ मे २०२३ रोजी घेण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, रद्द केलेल्या दोन हजार रुपयांच्या चलनातील एकूण नोटांपैकी आतापर्यंत सुमारे ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत.रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर त्या आपल्या खात्यात भरण्याची किंवा बँकांतून त्या बदलून घेण्याची सुविधा नागरिकांना दिली होती. ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. आज पुन्हा मुदत वाढवून ७ ऑक्टोबर करण्यात आली. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३.३२ लाख कोटी रुपये मूल्यांच्या दोन हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या होत्या. ७ तारखेनंतर बँकेकडे संपूर्ण किती नोटा आल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.