Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

20 हजारांची लाच घेताना वनपाल लाचलुचपत च्या जाळ्यात

20 हजारांची लाच घेताना वनपाल लाचलुचपत च्या जाळ्यात 


जळाऊ लाकडांच्या वाहतूक परवान्यावर तसेच गाडीवर कोणतीही कारवाई न करणेसाठी वीस हजाराची लाच घेताना हातकणंगले वनाधिकारी कार्यालयातील वनपाल रॉकी केतन देसा व मोहन आत्माराम देसाई या दोघांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कोल्हापूर विभागाचे पोलीस अधीक्षक सरदार नाळे यांनी केली.


कोल्हापूर : जळाऊ लाकडांच्या वाहतूक परवान्यावर तसेच गाडीवर कोणतीही कारवाई न करणेसाठी वीस हजाराची लाच घेताना हातकणंगले वनाधिकारी कार्यालयातील वनपाल रॉकी केतन देसा व मोहन आत्माराम देसाई या दोघांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कोल्हापूर विभागाचे पोलीस अधीक्षक सरदार नाळे यांनी केली.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील जत येथील तक्रारदार यांचा जळाऊ लाकडांचा खरेदी विक्रीचा व्यापार असून तक्रारदार हे जत (सांगली),सांगोला (सोलापूर) येथून जळावू लाकूड खरेदी करून ते भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी येथे आले होते. या ठिकाणी आल्यानंतर भाड्याने घेतलेल्या गाड्या मधील लाकडाची तपासणी न करण्यासाठी तसेच त्या वाहनातील जळावू लाकडांच्या वाहतूक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्या गाड्यावर कोणतीही कारवाई न करणेसाठी रॉकी केतन देसा व मोहन आत्माराम देसाई यांनी स्वतः साठी तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तसेच आरोपी देसा यांनी सदर लाच रक्कम आरोपी मोहन आत्माराम देसाई यांचेकडे देणेस सहमती देवून लाच रक्कम देण्याकरता तक्रारदारास प्रोत्साहन दिले.

त्यानंतर आरोपी देसाई यांनी तक्रारदार यांचेकडून २०हजाराची लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपीच्या विरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रॉकी केतन देसा (पद - वनपाल नेमणूक _ प्रभारी परिमंडळ वनाधिकारी कार्यालय,हातकणंगले (वनविभाग प्रादेशिक) रा.बाचणी,ता.कागल,जि. कोल्हापूर), मोहन आत्माराम देसाई,(पद -वनरक्षक. नेमणूक _ हातकणंगले परिमंडळ वनाधिकारी कार्यालय, हातकणंगले. रा.सुलोचना पार्क, प्लॉट नं.१४, ए वार्ड, नवीन वाशीनाका,कोल्हापूर,मुळ रा.कडगाव, ता.भुदरगड, जि. कोल्हापूर) या ठिकाणी राहण्यास आहे. सदरची ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक बापू साळुंके, संजीव बंबरगेकर, पोहेकॉ विकास माने,पोहेकॉ सुनिल घोसाळकर, पोना सचिन पाटील,पोकॉ संदीप पवार, पोकॉ उदय पाटील,चापोहेकॉ विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.