Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झिंगाट! मेंढ्यानी गवत समजून खाल्ली 100 किलो गांजाची पाने; मग अस काही झाले की.....

झिंगाट! मेंढ्यानी गवत समजून खाल्ली  100 किलो गांजाची पाने; मग अस काही झाले की.....


माणूस असो वा प्राणी भुकेलेले असताना कोणीही सर्व मर्यादा ओलांडताना दिसतात. ग्रीसमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका मेंढ्यांच्या कळपाने गवत समजून गंजाची पानं खाल्ली आहे, यानंतर त्यांची झालेली अवस्था पाहून शहरातील लोक हैराण झाले आहेत. ग्रीसमध्ये भीषण पूर आला आहे. मनुष्याबरोबर प्राण्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत खाण्यासाठी ताज गवत शोधणाऱ्या भुकलेल्या मेंढ्यांच्या कळपाने गांजाची पानं खाऊन फस्त केली. यानंतर त्यांचे वागणेच बदलू लागले.

भुकेलेल्या मेंढ्यांचा एक कळप औषधी गांजा उत्पादन करणाऱ्या एका ग्रीनहाऊसमध्ये घुसल्या आणि तेथील गांजाच्या शेतीचा मोठा भाग खाल्ला, यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. एका वेबसाईटच्या माहितीनुसार, अल्मायरॉस शहराजवळील ग्रीनहाऊसमध्ये १०० किलोग्रॅम गांजा खाणाऱ्या मेंढ्यांचा हा कळप पूर्वी ग्रीसमधील थेसालीच्या पूरग्रस्त भागात ताजे गवत शोधताना दिसल्या. मेंढ्यांमी केलेली पिकाची ही लूट पाहून मालकही आश्चर्यचकित झाले आहेत.



लू आणि डॅनियल वादळामुळे हे पीक आधीच उद्ध्वस्त झाले होते, पण आता मेंढरांनी उरलेलं पिकही खाऊन टाकले आहे, त्यामुळे मेंढ्यांच्या या कृतीवर हसावे की रडावे हे समजत नव्हते, असे तो शेतकरी म्हणाला. गांजा खाल्ल्याने मेंढ्यांच्या संपूर्ण कळपाचे वागणे अचानक बदलले. यावर मेंढपाळा म्हणाला की, गांजा खाल्ल्यानंतर मेंढ्या अगदी विचित्र वागू लागल्या, यावेळी मेंढ्या खूप खूश दिसल्या. त्या जोरजोरात उड्या मारत मस्ती करताना दिसल्या. त्यांचे हे वागणे रोजच्या स्वभावापेक्षा फार वेगळे होते. त्यांना त्यांच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट सुंदर वाटत होती, त्यांचे असे वागणे फार क्वचित पाहायला मिळते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.