Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LIC च्या 'या' योजनेत करा गुंतवणूक अन् दरमहा मिळवा 50 हजार रुपये

LIC च्या 'या' योजनेत करा गुंतवणूक अन् दरमहा मिळवा 50 हजार रुपये


भविष्यासाठी जर तुम्ही पैशांची बचत करण्यासाठी एक उत्तम योजना शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. आम्ही आज या लेखात तुम्हाला एलआयसीकडून राबवली जात असलेल्या एका मस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या तुम्ही फायदा घेत दरमहा तब्बल 50 हजार रुपयांचा परतावा प्राप्त करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो एलआयसीच्या या योजनेचे नाव नवीन LIC New Jeevan Shanti Plan असे या आहे.

पॉलिसी घेताना पेन्शन कधी घ्यायची ते निवडा

नोकरी केली तर काही कारणाने निवृत्ती घ्यावी लागते. अशा परिस्थितीत तुमचा उत्पन्नाचा स्रोत संपतो. अशा प्रकारे, तुमची समस्या सोडवण्यासाठी LIC ची जीवन शांती पॉलिसी आणली आहे. पेन्शन घेताना त्याची रक्कम निश्चित करता येते. एका निश्चित वेळेत किमान एक वर्षानंतर, तुम्हाला मासिक पेन्शन मिळू लागते.

LIC New Jeevan Shanti Plan वैशिष्ट्ये

एलआयसीची ही पॉलिसी एकल प्रीमियम योजना आहे. म्हणजे गुंतवणूक एकदाच करावी लागेल. या पॉलिसीमध्ये वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक पेन्शनची रक्कम मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याच वेळी, 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, 11 हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन उपलब्ध आहे. या योजनेत 6.81 ते 14.62 टक्के व्याज उपलब्ध आहे. या पॉलिसीमध्ये सिंगल लाईफ आणि जॉइंट लाईफ प्लॅन या दोन्हीमध्ये पेन्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

गुंतवणूक करण्यासाठी कमाल वय

पॉलिसीच्या या योजनेत 30 वर्षे ते 79 वर्षे वयोगटातील कोणीही गुंतवणूक करू शकते. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही सरेंडर करू शकता. त्यात गुंतवणुकीला मर्यादा नाही. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला काही रकमेसह त्याच्या खात्यात जमा केलेले पैसे मिळतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.