Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील ISIS च्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

पुण्यातील ISIS च्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

१८ जुलै रोजी पुणे शहरातून २ ISIS च्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी अशी त्यांची नावे असून महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. पोलिसांनी या दोघांच्या अटकेनंतर त्यांना मदत करणारे अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब नसरुद्दीन काझी यांनाही अटक केली. तसेच आरोपीची गाडी तसेच जिवंत काडतुसे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केलं आहे. यादरम्यान एटीएसच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येऊ लागले आहेत.

पोलिसानी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमधील माहितीच्या आधारे सदर आरोपींचे ISIS या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन स्पष्ट झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी जगभरातील दशतवादी हल्ल्यांचा अभ्यास केला होता. कोंढवा भागात इसिसशी संबंधित असलेला झुल्फीकार अली बडोदावाला याने दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होते अशीही माहिती समोर आली.

पोलिसानी सदर दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केलं आहे. रेकी करण्यासाठी वापरलेले एक दुचाकी वाहन, एक चार चाकी गाडी जप्त केली. तसेच गाडीत असलेले २ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे सुद्धा पोलिसांनी जप्त केले. याशिवाय बॉंब बनवण्यासाठी वापरतात ते केमिकल्स, रासायनिक पावडर, लॅब इक्युपमेन्टस त्यामध्ये थर्मामिटर, पिपेट हे साहित्य हस्तगत केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावरआहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे शहरात ठिकठिकाणी कडक सुरक्षा पाहायला मिळत आहे. ज्या हॉटेल मध्ये अमित शाह मुक्काम करणार आहेत त्याठिकाणीही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसेच डॉग स्कॉड पथक, बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक हॉटेल परिसरात दाखल झाले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.