याला म्हणतात आदर्श ! पती पत्नी दोघेही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवणयाचा निर्णय
इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुलं आपल्या मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. पुढील काही वर्षानंतर मुलांना मातृभाषेतून लिहिता-वाचता येऊ शकेल की नाही, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
इंग्रजी शाळांमुळे मातृभाषेतल्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. अनेक नेते, अधिकारी किंवा सेलेब्रेटी आपल्या भाषणात मुलांना मृताभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण प्रत्यक्षात त्यांचीच मुलं मोठमोठ्या पब्लिक शाळेत किंवा परदेशात उच्च शाळेत शिक्षक घेतात. आपल्या मुलांना मातृभाषा आली नाही तरी चालेल पण फर्राटेदार इंग्लिश यायला हंव यात पालक समाधान मानतात.
आयएएस जोडप्याचं आदर्श
मातृभाषेत शिकण्याचा केवळ सल्ला देणाऱ्या लोकांसमोर एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे. आयएएस अधिकारी म्हटलं की रुतबा, अधिकार, मागेपुढे फिरणारे कर्मचारी असं चित्र पाहिला मिळतं. त्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांना अनेकजण आयडॉल मानतात. अशाच एका आयएएस जोडप्याने केलेल्या एका कृतीची सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. या जोडप्याचं नाव आहे स्वाती आणि नितीन भदोरिया ,स्वाती आणि नितीन हे दोघंही आयएसएस अधिकारी असून त्यांच्या कामांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. नितीन यांनी पत्नी स्वातीसाठी डीएमचं पद सोडलं होतं. पण यानंतर दोघांचं नशीबा पालटलं आणि दोघंगी डीएम बनले.
मुलाला अंगणवाडीत प्रवेश
आता स्वाती आणि नितीन भदोरीया यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयाने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. स्वाती आणि नितीन यांनी आपल्या मुलाला अंगणवाडीत मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय घेतला असून शहरातील एका अंगणवाडीत मुलाचा प्रवेशही केलाय. आयएएस अधिकारी असलेल्या स्वाती यांनी स्वत: शाळेत जाऊन मुलाचा दाखला घेतला. अनेक मोठमोठ्या इंग्रजी खासगी शाळेंचे पर्याय असताना स्वाती आणि नितीन यांनी आपल्या मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाला लहानपणापासून सर्व गोष्टी शिकता याव्यात असा त्यांचा आग्रह आहे.नितीन भदोरिया हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. तर स्वाती भदोरिया 2012 बॅचच्या अधिकारी आहेत. पहिल्या प्रयत्नात स्वाती यांची संघी एका नंबरने हुकली होती. पण 2012 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी 74 व्या क्रमांकवर झेप घेतली. आयएएस अधिकारी बनल्यानंतर नितीन आणि स्वाती यांनी लग्न केलं. आता दोघंही छत्तीसगडमधल्या उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावतायत.
पत्नीसाठी सोडलं डीएम पद
नितीन भदोरिया हे 2016 मध्ये पिथोरागडचे डीएम बनले. पण त्यावेळी पत्नी स्वाती गरोदर होत्या. त्यामिळे त्यांनी डीएम पदभार स्विकारला नाही. त्यामुळे त्यांना एसडीओ बनवण्यात आलं. स्वाती यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर 2018 मध्ये नितीन आणि स्वाती दोघंही डीएम बनले. सध्या स्वाती भदोरिया छत्तीसगडमधल्या चमोली जिल्ह्याच्या तर नितीन भदोरिया अल्मोहडा जिल्ह्याचे डीएम आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.