सांगलीतील Hotel Delicious मध्ये मांजराने मारला शोरमावर ताव, पहा व्हिडिओ
सांगली, ता. १० : खवय्यांच्या पसंतीचा चिकन शोरमांची सांगलीत सध्या क्रेझ आहे. मात्र, सांगलीतील एका 'चविष्ठ' हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टांगलेल्या चिकन शोरमावर ग्राहकांसमक्ष एका मांजराने ताव मारला. ग्राहकांनी पुराव्यादाखल त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले. ही बाब त्या ग्राहकांनी हॉटेल चालकाच्या लक्षात आणून दिली. मात्र, त्यांनी तो आमचा खासगी भाग आहे असा पवित्रा घेत तक्रार उडवून लावली. मग त्या तरुण ग्राहकांनी अन्न व औषध प्रशासनास लिखित तक्रार दिली. त्यावर त्यांनी आमचे मोठे साहेब बाहेरगावी आहे. ते आल्यानंतर बघू असे सरकारी छाप उत्तर दिले.
याचा घटनाक्रम असा दोन मित्र चिकन शोरमा खायचा प्लॅन करून शंभर फुटी रस्त्यावरील त्या 'चविष्ठ' हॉटेलच्या आवारात गेले. मात्र, तिथूनच त्यांना दुचाकी पार्किंग करीत असतानाच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टांगलेल्या चिकन शोरमावर नजर गेली. तेव्हा चक्क एक काळे मांजर त्यावर ताव मारत होत. तेव्हा एकाही कर्मचाऱ्याचे त्याकडे लक्ष नव्हते. तरुणांनी हुशारीने मांजराचे मोबाईलमध्ये शूटिंग केले. नंतर कर्मचाऱ्यांना त्याबद्दल जाब विचारला. तर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली तर त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि साहेब आल्यावर बघू, असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी कार्यालय गाठत आपला अनुभव कथन केला. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराबाबत हॉटेलचालक आणि प्रशासकीय यंत्रणांची ही ढिलाई अक्षम्य अशीच.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.