डॉक्टरांनो सावधान ! Generic Medicine लिहून न दिल्यास परवाना होणार रद्द, पहा निर्णय काय आहे?
नॅशनल मेडिकल काउंसिलने आज मेडिकल क्षेत्रासाठी आज काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील एक म्हणजे डॉक्टरांशी गैरवर्तन केल्यास संबंधितांच्या रुग्णावर उपचार नाकारण्याचा अधिकार डॉक्टरांना देण्यात आला आहे.
त्याचबरोबर मेडिकल कमिशनने रुग्णांच्या हितासाठीही एक मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांना आता प्रिस्क्रिप्शनवर जेनेरिक औषध लिहून देणे बंधनकारक असणार आहे, असा नियम नॅशनल मेडिकल कमिशनने जारी केला आहे.
डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषध लिहून देणे गरजेचे असते, परंतु डॉक्टरांकडून जेनेरिक औषधा व्यतिरिक्त इतर औषध लिहून देण्यास प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशनने डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून न दिल्यास त्यांना कारवाईचा सामना करावा लागणार आहे. या नियमाअंतर्गत डॉक्टारांचा परवाना काही काळासाठी रद्द करण्यात येऊ शकतो.
भारतात औषधांवर होणार खर्च हा सार्वजनिक खर्चाचा एक मोठा भाग आहे तसेच या नियमात म्हटलं गेलं आहे की, जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांच्या तुलनेत ३० ते ८० टक्के स्वस्त असतात. जेनेरिक औषधे लिहून दिल्यानेआरोग्य सेवेवरील खर्चाचा ताण कमी होईल. ब्रँडेड औषधे ही पेटेंटच्या बाहेर आहे. ही औषधे वेगेवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली विकली जातात. ही औषधे महाग असतात. तर ब्रँडेड जेनेरिक औषधांच्या किंमतीवर नियंत्रण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.