देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात FIR, 'त्या' वकिलासह ६ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई
नागपूर : १५ ऑगस्ट २०२३: सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती लोया एका लग्नाला गेले होते. मात्र, त्या लग्न सभारंभात न्यायमूर्ती लोया यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पंरतु, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यूमागे भाजप नेत्यांचा हात असल्याचा आरोप करत याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी नागपूरचे वकील सतीश उईके यांनी केली होती. वकील सतीश उईके या प्रकरणामुळे चर्चेत आले होते.
त्यानंतर वकील सतीश उईके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मोठा आरोप केला होता. फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी स्थानिक न्यायालयात फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केली. तसेच, निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.