Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आबाचं कुटुंब शेवटपर्यंत पवारसाहेबासोबत; रोहित पाटील

आबाचं कुटुंब शेवटपर्यंत पवारसाहेबासोबत; रोहित पाटील 


आमदार सुमन पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत पुणे येथील एका हॉटेलमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची बातमी एक अफवा आहे. आम्हाला सुध्दा प्रसारमाध्यमातून हे माहिती मिळाली होती.

आबा कुटुंबाची भूमिका अजित दादा पवार यांनी बंड केले त्यावेळी स्पष्ट केली आहे. आम्ही शेवटपर्यंत शरद पवार यांचेसोबतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित आर. आर. पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे अजित पवार गटात सहभागी जातील अशा अफवा पसरल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील यांनी हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतली असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून येत आहेत. याबाबत प्रतिक्रिया विचारले असता रोहित पाटील बोलत होते.

रोहित पाटील म्हणाले, आर. आर. आबा यांच्या पाठिशी कोणतीही राजकीय ताकद नसताना मोठ्या पदावरती काम करण्याची संधी दिली. आबांचे राजकारण पवार साहेब यांचा पाठिंबा, निष्कलंक चारित्र्य व या मतदारसंघातील लोकांचे प्रेम आणि पाठिंबा या गोष्टींच्या जिवावर मोठे झाले होते. आमचीही राजकारणातील वाटचाल तत्वे आणि निष्ठा या पायावरतीच टिकून आहे.

आबा कुटुंबाची भूमिका अजित पवार यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेंव्हाच स्पष्ट केलेली आहे. पवार साहेबांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, ही भूमिका कराड येथेच जाहीर केली आहे. आजही आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.