फक्त एक महिना दारू सोडून बघाच, शरीरावर असे होतील बदल ,संशोधक सुद्धा हैराण
मुंबई : मद्यपान, ध्रूम्रपान यासारखी व्यसनं आरोग्यासाठी धोकादायक असतात. अशा व्यसनांमुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. लिव्हर, किडनी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. मनावर देखील परिणाम होतो. त्यामुळे मद्यपान न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. मध्यम स्वरुपाचं मद्यपान आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पण जास्त प्रमाणात मद्य घेणं धोकादायक ठरू शकतं. तुम्ही जर एक महिना मद्यपान केलं नाहीत तर त्यामुळे आरोग्यात सकारात्मक बदल दिसू लागतात.
एक महिना मद्यपान केलं नाही तर शरीरावर कोणते चांगले परिणाम दिसतात, ते जाणून सविस्तर जाणून घेऊया.जगभरातल्या अनेक संस्कृती आणि समाजांमध्ये मद्यपान करणं हे खोलवर रुजलेलं आहे. पण जास्त प्रमाणात मद्यपान आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतं. आरोग्यासाठी तुम्ही एक महिना मद्यपान सोडू शकता. याला 'ड्राय मंथ' असं संबोधलं जातं, डीएनए'ने याबद्दल वृत्त दिले आहे.महिन्याच्या सुरुवातीला मद्यपान सोडल्यानंतर जसजसे दिवस पुढे जातात तसतसं तुमचं लिव्हर चांगलं होऊ लागतं.
डिटॉक्सिफिकेशन, चयापचय आणि पोषक घटकांची साठवण यात लिव्हर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. मद्यपानापासून दूर राहिल्याने लिव्हरमध्ये होणारी जळजळ आणि चरबीचा संचय कमी होऊ शकतो. यामुळे लिव्हरचं कार्य सुधारतं. परिणामी, एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम जाणवू लागतो.मद्यपान बंद केल्यानंतर तुमचं शरीर डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुरू करतं.अल्कोहोलचं चयापचय करण्याची जबाबदारी लिव्हरची आहे. मद्यपान थांबवल्यानंतर लिव्हरला विषारी पदार्थांवर कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यास वेळ मिळतो. पहिल्या आठवड्यात तुम्हाला चिडचिड, मूड बदलणं आणि झोपेची अडचण अशी लक्षणं दिसू शकतात. त्यानंतर तुम्हाला झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येईल.अल्कोहोल झोपेचे चक्र विशेषतः डोळ्यांच्या जलद हालचालींमध्ये व्यत्यय आणतं. यासाठी विश्रांतीची गरज असते. मद्यपान न केल्याने तुम्हाला अधिक शांत झोप लागण्याची शक्यता वाढते. डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुरू राहिल्याने बऱ्याच व्यक्तींनी दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुधारित मानसिक स्पष्टता आणि मूड बदलण्याबाबत तक्रार केली. अल्कोहोलमुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर प्रभाव वाढतो परिणामी दुःख आणि चिंतेची भावना येऊ शकते.अल्कोहोलपासून दूर राहिल्याने तुमच्या मेंदूतील रसायनं पुन्हा संतुलित होण्यास सुरूवात होते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन आणि ऊर्जा पातळी वाढते.मद्यपान बंद केल्यानंतर तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला शारीरिक फायदे दिसू लागतात. अल्कोहोल हे कॅलरी डेन्स्ड असतं. अनेकदा मद्यपानसोबत आरोग्यास अपायकारक असलेले स्नॅक किंवा जेवण घेतलं जातं.
एक महिना मद्यपान न केल्यास वजन कमी होण्यास किंवा वजनाचं उत्तम व्यवस्थापन करण्यास हातभार लागतो. अल्कोहोल निर्जलीकरण करते. त्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. शरीर हायड्रेट होऊ लागले की तुम्ही तरुण दिसू लागता आणि त्वचेचा रंगही बदलतो. त्यामुळे हळूहळू मद्यपानाचं व्यसन सोडल्यास त्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू लागतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.