Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझ्या पोटचा गोळा कुठे आहे? पोटच्या पोराचा जीव घेणाऱ्या आईचा पोलीसांना सवाल, पोलीसही झाले हैराण

माझ्या पोटचा गोळा कुठे आहे? पोटच्या पोराचा जीव घेणाऱ्या आईचा पोलीसांना सवाल,  पोलीसही झाले हैराण 


अनेक मुलांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत केलेल्या गैरवर्तनाच्या कथा ऐकल्या असतील. पण, कोणत्याही पालकाच्या मनात आपल्या मुलांबद्दल वाईट विचार असतील यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे. राजस्थानमधील उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आईच आपल्या तरुण मुलाच्या जीवाची शत्रू बनली आहे. सकाळी 6.30वाजता 37 वर्षीय मनीषा पारीख हिने तिचा 14 वर्षांचा मुलगा पुरंजय पारीख याचा दोरी बांधून गळा आवळून खून केला. 

असे सांगण्यात आले की पुरंजयला चार मिनिटे त्रास होत राहिला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मनीषाचे सासरे आणि मेव्हणे घराच्या तळमजल्यावर होते, मात्र त्यांनाही पत्ता लागला नाही. घराच्या पहिल्या मजल्यावर मनीषा आणि तिचे कुटुंब राहतात. अंबामाता पोलिस स्टेशनचे अधिकारी हनुवंत सिंह राजपुरोहित म्हणाले ही घटना सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. पुरंजय झोपला होता. मनीषा त्याच्या अंथरुणाजवळ आली आणि पुरंजयच्या गळ्यात दोरी घालून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. 

मुलगा 3 ते 4 मिनिटे तडफडला आणि नंतर त्याचे निधन झाले. यानंतर मनीषानेच सायंकाळी सातच्या सुमारास नियंत्रण कक्षाला फोन केला. तिने स्वतःच आपल्या मुलाची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडला. महिला एका वेगळ्याच जगात जगत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस महिलेच्या खोलीमध्ये गेले होते त्यावेळी महिला आपला जीव देण्याचा प्रयत्न करत होती. 

५ वर्षांपासून मनिषावर उपचार सुरु होते. ती आजारी होती. पण आपण ठीक असल्याचे सांगत तिनं औषध घेणं बंद केलं होतं. त्यामुळे तिची स्थिती आणखी बिघडली होती. आपल्या पतीचं दुसऱ्या एका महिलेशी नातं असल्याचा तिला येत संशय होता. आपल्या बरोबर आणि मुलाबरोबर काहीतरी चुकीचं होणार अशी भितीही तिला वाटत होती, अशी माहिती पोलिसांनी महिलेच्या चौकशीनंतर दिली आहे. आपण मुलाचा जीव घेतला आहे हे तिच्या लक्षातही राहीले नव्हते. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले तेव्हा ती मुलाच्या प्रकृतीबाबत विचारणा करत होती. तसेच आपला मुलगा कुठे आहे असे पोलिसांना विचारत होती.

हत्येचे कारण काय, याबाबत कुटुंबीयांकडे चौकशी करण्यात आली. यामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे किंवा वादाची चर्चा झाली नाही. कुटुंबीयांनी सांगितले की, मनीषा मानसिक आजारी आहे.  2018 पासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रागाच्या भरात तिने मुलाची हत्या केली. वैद्यकीय कागदपत्रांच्या तपासणीच्या आधारे पोलीस कारवाई करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.