Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोलापुरात भिडे गुरुजींच्या समर्थकांना पोलिसांनी दिला लाठीचा प्रसाद.....

सोलापुरात भिडे गुरुजींच्या समर्थकांना पोलिसांनी दिला लाठीचा प्रसाद.....

सोलापूर : भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ संपूर्ण देश आणि महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. विविध संस्था, संघटना तसेच इतर पक्षांनी भिडे गुरुजींच्या अटकेची मागणी केलेली आहे.

त्यामुळे भिडे गुरुजी यांचा अडचणीत वाढ झाली असताना दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी सोलापुरात छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येऊन समर्थनार्थ घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची कोणतीही परवानगी नसल्याने फौजदार चावडी पोलिसांनी तेथील सर्वच कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले.पोलीस ठाण्यासमोर ही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा मात्र पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला पळापळी सुरू झाली भाजपच्या कार्यकर्ते राजकुमार पाटील यांचा शर्ट फाटला गेला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.