Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री शिंदेना लागली ' डुलकी ' व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री शिंदेना लागली ' डुलकी ' व्हिडिओ व्हायरल 


पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे जोरदार भाषण ठोकलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदें हे पुरस्काराच्या कार्यक्रमात तेही मोदींचे भाषण सुरू असताना 'डुलकी' घेत असल्याचा व्हिडिओ व्हायर झाला आहे. या मुद्यावरून विरोधक आता शिंदेंना घेरण्याची शक्यता असून, त्यातून नव्या आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदी या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले आहेत. पुरस्काराला उत्तर देताना पंतप्रधान बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कारण पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना शिंदेंना चक्क डुलकी लागली. ही डुलकी माध्यमांच्या कॅमैऱ्यात कैद झाली.

पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल बैस यांच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे बसले होते. पंतप्रधान मोदींनी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव घेतले. त्यामुळे सर्व कॅमेरे शिंदेंच्या चेहऱ्यावर स्थिरावले मात्र, त्यावेळी शिंदेंना डुलकी लागली होती. यानंतर मोदींनी फडणवीस यांचे नाव घेताच उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणा दिल्या.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना उत्साह वाढला आहे. हा पुरस्कार १४० कोटी भारतीययांना समर्पित करीत असल्याची, भावना त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, 'लोकमान्य टिळकांच्या नावात गंगाधर हा शब्द असल्याकडे लक्ष वेधून, या पुरस्काराची रक्कम 'नमामी गंगे'या योजनेसाठी देण्याची घोषणाही मोदींनी केली. 'ज्यांच्या नावातच साक्षात गंगा नदीचे नाव आहे. त्यामुळे या पुरस्काराची रक्कम मी 'नमामि गंगा' या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.