Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल 


विटा : येथील विवाहिता मृत्यूप्रकरणी एका वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. ऋषिकेश आनंद सुर्यवंशी (वय २६, रा.विटा) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी कोमल बिसुरकर या शाहूनगरमधील एका घरात राहणाऱ्या विवाहितेने जीवन संपवले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. याबाबत या महिलेचा भाऊ प्रतीक सुरेश सावंत (रा.विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली होती. कोमल या येथील निलसागर हॉटेलच्या मागे भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. संशयित अॅड.

ऋषिकेश सूर्यवंशी हा तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्याच्या हेतूने सतत तिचा पाठलाग करीत होता. घरी आणि ती काम करीत असलेल्या ठिकाणी ये-जा करत असल्याने त्याच्या त्रासास कंटाळून कोमल यांनी जीवन संपवले. याप्रकरणी अॅड. ऋषिकेश सुर्यवंशी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.