Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक

हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक


सांगली :  कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता हद्दपार असतानाही सांगलीत फिरणाऱ्यास अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. अमन मिरसाब पेंढारी (वय 19, रा. गवळी गल्ली, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हद्दपारिसह प्रतिबंधक कारवाई केलेल्यांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्याचे आदेश शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी पथकाला दिले होते. 

त्यानुसार बुधवारी रात्री पथक गस्त घालत होते. त्यावेळी हद्दपार असूनही अमन रिसाला रोडवर थांबलेला आढळला. त्याला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. तरीही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता तो सांगलीत आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पवार, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, श्रीपाद शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.