Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गरिबांचा होणार फायदा! हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार

गरिबांचा होणार फायदा! हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार

आज आपल्या देशात केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून विविध योजना राबवले जात आहे. ज्याचा फायदा गरिबांना मोठ्या प्रमाणात होत आहे. अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेअंतर्गत गरिबांना तब्बल पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो. जर तुम्हाला देखील या योजनेत सहभागी व्हायचा असेल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत.

केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. SC/ST, बेघर, निराधार, दान किंवा भिक्षा मागणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आयुष्मान कार्ड बनवले जाते, त्यानंतर तुम्ही रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता. या योजनेंतर्गत लोकांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील 15 दिवसांचा सर्व प्रकारचा खर्च सरकार स्वतः उचलते. विशेष म्हणजे या योजनेत कुटुंब एक रुपयाही खर्च करत नाही, आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे.

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

आधार कार्ड

रेशन कार्ड

उत्पन्न प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

अशी तपासा पात्रता

तुमची पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला I am eligible या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्यानंतर त्यावर वन टाईम पासवर्ड येईल ज्यावर OTP येईल. हा OTP भरा. यानंतर दोन पर्याय येतील ज्यावर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. आता तुम्हाला येथे दुसरा पर्याय दिसेल, जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल. आता सर्च ऑप्शनवर क्लिक करा. तुम्ही हे सर्व पर्याय पूर्ण करताच तुमची पात्रता कळेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.