Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात

सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात


मुंबई:  भारततत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाइन गेमची जाहिरात करु नये, तसेच या जाहिरातमुळं तरुण वर्ग ऑनलाईन गेमकडे वळला जातो. परिणामी यामुळं तरुण वाईट मार्गावर जात असून, तरुणांचे नुकसान होते. म्हणून सचिन तेंडूलकरने ऑनलाईन जाहिरात करु नये, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी मागणी केली होती. तसेच याबाबत सचिनाल त्यांनी पत्र देखील लिहिले होते. दरम्यान, या संदर्भात सचिननेच्या घरासमोर बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. मात्र वेळीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बच्चू कडू यांनी दिला होता इशारा.

दरम्यान, ऑनलाईन गेमची जाहिरात करु नये, यामुळं तरुणाई बरबाद होत आहे, अश मागणी कडूंनी यापूर्वी केली होती. तसेच याबाबत त्यांनी सचिनला पत्र पाठवले होते, पण सचिनकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळं त्यांना आज आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागले. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. बच्चू कडू यांनी मुंबईतील सचिनच्या घराबाहेर आंदोलन केले. या वेळी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या विरोधात घोषणाबाजी केली.


काय आहे प्रकरण?

सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांना वचन दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाखू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. मात्र, तरीही त्याने केलेल्या एका जाहिरातीवरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत. त्याने ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या जाहिरातीलाच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा विरोध आहे. ऑनलाईन गेममुळं पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. एकिकडे गेममध्ये पैसे गुंतवू नका अशी जाहिरात करायची आणि तेच दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असा दुहेरी धंदा सुरू असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला होता. त्यामुळं सचिन आम्हाला अभिमान आहे, तो भारतरत्न आहे. त्यांने या जाहिरातीतून माघार घ्यावी अशी मागणी कडूंनी केलीय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.