वीराचार्य बाबासाहेबांनी सभेची कनेक्टिव्हिटी वाढवली..रावसाहेब पाटील
सांगली दि.१७: वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी समाजासाठी पूर्णवेळ झोकून देऊन काम केले. सभेच्या वसतिगृहात वास्तव्य करुन जैन समाजाला दक्षिण भारत जैन सभेच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले म्हणून वीर सेवा दलाच्या माध्यमातून सभा तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली.
वीराचार्य बाबासाहेबांना सभेने मध्यवर्ती कार्यकारी मंडळावर निवडले होते त्यामुळे वीराचार्यांनी समाज आणि सभा या मध्ये समन्वयक संघटक नेता म्हणून मोठी कामगिरी केली आहे. वीराचार्य बाबासाहेबांच्या कामाचा वारसा नेटाने पुढे नेण्यासाठी समाजातील युवा वर्गाने मोठ्या संख्येने सभेच्या कार्यात सहभाग द्यावा असे प्रतिपादन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित वीराचार्य अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रावसाहेब पाटील व डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते वीराचार्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने अभिवादन करण्यात आले. यावेळी सभेचे महामंत्री प्रा. एन.डी.बिरनाळे व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश खोत व सर्व स्टाफ उपस्थित होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.