Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकपदी संजय साळुंखे

सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकपदी संजय साळुंखे



निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे संजय १ ऑगस्टपासून मिरजेतील सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संचालकपदी रुजू झाले आहेत, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद जगताप यांनी दिली.

डॉ. साळुंखे यापूर्वी सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्त होते. डॉ. साळुंखे यांनी एम.बी.बी.एस., बी.एल.ओ. या पदव्या मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त केल्या आहेत. तसेच मिरजेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेस प्रारंभ केला. २००३ मध्ये एम. एस. (ई.एन.टी.) ही पदव्युत्तर पदवी, ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे जे हॉस्पिटल मुंबई येथून प्राप्त केली.

जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा दिली. सन २०१० मध्ये एम.पी.एस.सी. अंतर्गत वर्ग- १. जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाचवा क्रमांक मिळवला. २०१६ पासून ते जिल्हा शल्यचिकित्सक पदावर कार्यरत होते. मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये ते रुजू झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, आरोग्यसेवेचा ध्यास असल्यामुळे मी उच्च दर्जाची सेवा देत असलेल्या सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रुजू होण्याचे ठरविले.

हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी हॉस्पिटलच्या मेडिकल मॅनेजमेंट सिस्टिममध्ये डॉ. साळुंखे सरांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे रुग्णांना आधुनिक व उच्च दर्जाची सेवा देण्यात मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हॉस्पिटलचे चेअरमन, अवजड उद्योग मंत्रालयाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी यांनी डॉ. साळुंखे यांचे स्वागत केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.