सततच्या बातम्यांमुळे ज्योती मौर्य पोहचल्या उच्च न्यायालयात; म्हणाल्या.....
एसडीएम ज्योती मौर्य पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता ज्योती मौर्य यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालय गाठले आहे. आपल्याविरोधातील सर्व कंटेन्ट मीडियातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
भविष्यात मीडियाला आपल्या विरोधात बातम्या न चालवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही ज्योती मौर्य यांनी न्यायालयाला केली आहे.
ज्योती मौर्य गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहेत. ज्योती मौर्य या उपविभागीय दंडाधिकारी आहेत. ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सिव्हिल सेवक झाल्यानंतर पती आलोकपासून वेगळं होण्याचा निर्णय़ घेतला होता.
ज्योती मौर्य यांचे पती आलोक मौर्य यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते रडताना दिसत होते. तसेच आरोप करत होते की, ज्योती एसडीएम झाल्यानंतर त्यांना सोडून गेली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ज्योती मौर्य बेवफा है" ट्रेंडमध्ये आलं होते. आलोक मौर्य हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील पंचायत समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत.ज्योती मौर्य यांनी न्यायालयासमोर आपल्याशी संबंधित काहीही चालवण्यापासून प्रसारमाध्यमांना थांबवण्याची विनंती केली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्योती मौर्य यांच्याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. याला कंटाळून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.