धक्कादायक! चिकन थाळीत अढलले उदंराचे मास; वांद्रे येथील प्रतिष्ठित हॉटेलवर गुन्हा
वांद्रे : तुम्ही चिकन आणि मटन खात असाल तर सावधान. वांद्रे येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन व मटणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे मांस देण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात रेस्टोरेंत मालकासह आचारी आणि चिकन व मटन पूरवनाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला उघडकीस आला.
या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ढाब्याचा मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिक्वेरा (वय ४०), हॉटेलचे आचारी आणि चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराग सिंग (वय ४०) हे त्यांचा मित्र अमितसोबत बांद्रा पश्चिम येथील पाली नाका येथील ढाब्यावर सोमवारी (दि १३) जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी चिकन, मटण आणि रोटी ही थाळी ऑर्डर केली.
थोड्यावेळ त्यांनी जेवण घेतल्यावर अनुराग सिंग त्यांचा मित्र अमित यांना चिकनच्या डिशची चव काहीतरी वेगळी लागत असल्याचे लक्षात आलं. यानंतर त्यांनी प्लेटमध्ये निरखून पाहिलं असता ताटात जरा वेगळा मांसाचा तुकडा दिसला. त्यांनी त्यांची पाहणी केल्यावर तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकारानंतर अनुराग सिंग यांनी थेट वांद्रे पोलिस स्टेशनगाठले. त्यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.