द अम्युचर खो-खो असोसिएशन सांगलीचे सन २०२३-२४ चे जिल्हास्तरीय खो-खो पंच शिबीर राणाप्रताप तरुण मंडळ, कुपवाड यांच्या आयोजनाखाली आज रविवार दि.१३ ऑगस्ट, २०२३ रोजी देशभक्त आर.पी.पाटील विद्यालय, कुपवाड याठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध व उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उदघाटन सांगली शहर भाजपा जिल्हाध्यक्ष व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक मा.प्रकाश ढंग यांचे शुभहस्ते व डॉ. समीर शेख- अध्यक्ष द अम्युचर खो-खो असोसिएशन सांगली, डॉ.प्रशांत इनामदार- सचिव द अम्युचर खो-खो असोसिएशन सांगली, राणाप्रताप तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री.महावीर पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. चव्हाण मॅडम, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री.प्रशांत पवार व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या शिबिरात सांगली जिल्ह्यातील ६० पंचांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सुरुवातीला डॉ. प्रशांत इनामदार यांनी पंच, खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, संलग्न संस्था यांनी पाळवयची आचारसंहिता व संभाव्य येणाऱ्या नवीन नियमाबद्दल माहिती व सांकेतिक खुणा याबाबत पीपीटी च्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर पंच मंडळाचे सचिव प्रा.सचिन चव्हाण यांनी खो-खो खेळातील नियम, व्याख्या यांचे विश्लेषण तसेच पंचाची गुणवैशिष्ट्ये, पंचाची कर्तव्ये, पंचगिरीचे महत्व व पंचगिरीचे उद्देश यासंदर्भात पीपीटी च्या माध्यमातून विस्तृत असे मार्गदर्शन केले.तांत्रिक समितीचे सचिव श्री.तुकाराम माळी यांनी गुणपत्रिका भरणे याविषयी संपूर्ण माहिती पीपीटी च्या माध्यमातून सांगितली. दुपारच्या सत्रात पंच मंडळ व तांत्रिक समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष मैदानावर प्रात्यक्षिक, पंच गटवार चर्चा, पंचांनी उभे रहावयाच्या जागा याविषयी माहिती सांगितली. सायंकाळच्या सत्रात शिबिरात सहभागी झालेल्या सर्व पंचांच्या निरुत्तर प्रश्नांवर चर्चा व शंका समाधान यांवर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक मा.शेडजी मोहिते, कुपवाड शहर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रमोद गौडाजे हे उपस्थित होते. उदघाटन व समारोप समारंभ याचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत इनामदार, आभार श्री.संतोष कर्नाळे व सूत्रसंचालन प्रा.सचिन चव्हाण यांनी पार पाडले. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राणाप्रताप तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री.महावीर पाटील, श्री.रमेश पाटील, श्री.संतोष कर्नाळे, श्री.संजय हिरेकुर्ब, श्री.सोमनाथ स्वामी, प्रा. सचिन चव्हाण, श्री. शिवसागर पाटील व मंडळाचे सर्व सदस्य व खेळाडू यांनी परिश्रम घेतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.