Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने कन्नड अभिनेते उपेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल

आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने कन्नड अभिनेते उपेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल 


आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारा प्रसिद्ध कन्नड अभिनेता उपेंद्र सध्या वादात सापडला आहे. उपेंद्र यांनी फेसबुक लाईव्ह सत्रादरम्यान एका समाजाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने ते वादात सापडले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे.

उपेंद्र त्यांचा राजकीय पक्ष प्रजाकीयाच्या वर्धापनदिनानिमित्त फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाइव्ह होते. पक्षाबद्दल बोलत असताना त्यांनी एका समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी त्यांच्यावर बेंगळुरूमधील चेन्नम्माना केरे अचुकट्टू पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

उपेंद्र यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ हटविला आणि माफी मागीतली. 'मी आज फेसबुक आणि इंस्टाग्राम लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये एक म्हण वापरली आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे समजताच, मी माझ्या सोशल मीडियावरून तो लाइव्ह व्हिडिओ डिलीट करतो आणि या शब्दांबद्दल क्षमस्व,' असे त्यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.