सांगलीत आढळला पाढंरा साप
प्राणीमित्र स्वप्निल यादव यांनी बायपास रस्त्यावरील एका घरात पांढरा सर्प पकडला. इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर, जावेद शेख यांनी त्याला मानद वनाधिकारी अजित पाटील यांच्या ताब्यात देऊन निसर्गात मुक्त करण्यात आले.
हा साप कवड्या जातीचा असून मादी अंडी देऊन निघून जाते. यानंतर अंड्याला मिळणारी ऊब वातावरणातील बदलांमुळे कमी झाल्यास अंड्यातील सापामध्ये रंगद्रव्यांचा अभाव निर्माण होतो. अल्बिनीझम प्रक्रियेमुळे सापांच्या शरीरातील मेलॅनिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांच्या त्वचेचा मूळ रंग हळूहळू नष्ट होतो. हा बिनविषारी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.