सांगलीतील तीन व्यापाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा
सांगली: सांगलीतील दोन व्यापारी बंधूंकडून हळद, बेदाणा खरेदी करून त्याचे पैसे परत दिले नाहीत. तसेच व्यवसायात अडचण असल्याचे सांगून एकाकडून २५ लाख रूपये उसने घेऊन या तिघांचीही तब्बल दोन कोटी, ३४ लाख १७ हजार ६५२ फसवणूक करण्यात आली आहे. २०१५ ते २०२० या काळात ही घटना घडली. सांगलीतील तिघांना गंडा घातल्याप्रकरणी गुजरात येथील अहमदाबादमधील दोन व्यापारी बंधूंवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकितकुमार अमृतलाल पटेल, जयकुमार अमृतलाल पटेल (दोघेही रा. अहमदाबाद, गुजरात) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिलकुमार ईश्वरलाल पटेल (वय ५८, रा. ८० फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) यांनी फियार्द दिली आहे. अनिलकुमार यांची सांगलीतील माकेर्ट याडर् येथे ईश्वरलाल पटेल नावाची फमर् आहे. तर त्यांचा भाऊ अशोककुमार पटेल यांची सोमनाथ ट्रेडसर् नावाची फमर् आहे. या दोन्ही संशयितांनी त्यांच्याकडून १३ कोटी ९१ लाख ७ हजार ९०६ रूपयांचा हळद आणि बेदाणा खरेदी केला होता.
या दोघांकडून घेतलेल्या मालाचे काही पैसे त्यांनी परत केले होते. मात्र त्यांची २ कोटी ९ लाख १७ हजार ६५२ रूपये इतकी रक्कम त्यांनी परत केली नाही. या दोन्ही भावांनी त्यांच्याकडे वारंवार तगादा लावला तरीही त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान अनिलकुमार पटेल यांचे मित्र प्रकाश बसगोंडा पाटील यांना संशयितांनी व्यवसायात अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडून २५ लाख रूपये उसने घेतले होते. तेही त्यांनी परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिलकुमार पटेल यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फियार्द दिली. त्यानुसार गुजरातच्या पटेल बंधूंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.