विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी जातपडताळणी चे काम शनिवार रविवारीही चालू राहणार
पुणे: शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मधील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय / आयुष शिक्षण आणि कला शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी केंद्रभुत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेल्या आहेत.
अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्याच्या तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ३+२= ५ महिने एवढी मुदत शासनाने कायदा व नियमा द्वारे ठरविली आहे. सर्व समित्यांनी कॉलेज मध्ये जाऊन याबाबत जनजागृती देखील केलेली आहे . तरी सर्व परीक्षार्त्याना प्रवेश मिळावा व त्यांना वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे यासाठी शनिवार आणि रविवारी सुट्टयांच्या दिवशी ही सर्व जिल्हा जात पडताळणी समितीचे कामकाज चालू ठेवण्याचे आदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) महाराष्ट्र शासन चे संचालक सुनील वारे यांनी दिले आहेत .त्यामुळे आता सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समितीचे कामकाज चालू राहणार आहे .
अनेक विदयार्थी यांनी जुलै व ऑगस्ट मध्ये उशीराने अर्ज सादर केल्याचे दिसून येते. माहे जुलै २०२३ अखेर सर्व समित्यांनी ४३,३५९ प्रकरणे निकाली काढली आहेत. CET CELL चे पात्र विद्यार्थी यांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत Sms / Email व पत्राव्दारे संबंधित समित्यांमार्फत कळविण्यात येऊनही अनेक अर्जदार/विद्यार्थी यांनी संबंधीत समित्यांशी संपर्क साधलेला दिसून येत नाही. अर्जावरती त्रुटी पूर्तता करण्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची आहे. अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना सुटटीच्या दिवशी शनिवार व रविवार रोजी कार्यालय सुरु ठेवण्याचे ऑनलाईन आढावा बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले आहेत.जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये अर्जदार/विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्राबाबत त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी संबंधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरीत संपर्क साधावा व त्रुटींची पूर्तता करावी जेणेकरुन समितीला विहित वेळेत निर्णय घेता येईल असे आवाहन मा. श्री. सुनिल वारे, महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तथा मुख्य समन्वयक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या (सर्व) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.