Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकच्या 'या' माजी मुख्यमंत्र्यांना हृदयविकाराचा झटका

कर्नाटकच्या 'या' माजी मुख्यमंत्र्यांना हृदयविकाराचा झटका

बंगळूर : धजद नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना बुधवारी सकाळी सौम्य हृदयविकाराचा धक्का आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते नियमित कामकाज चालू ठेवू शकतात. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. आम्ही काही नियमित चाचण्या घेत आहोत, असे जयनगर अपोलो हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. गोविंदिया यतीश यांनी सांगितले. कुमारस्वामी यांना पहाटे ३.४० च्या सुमारास अस्वस्थता वाटू लागली.


डॉ. पी. सतीशचंद्र आणि टीमच्या देखरेखीखाली त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची पत्नी अनिता कुमारस्वामी रुग्णालयात आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. ६३ वर्षीय कुमारस्वामी यांना मधुमेहचा त्रास आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत दोन हृदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.