Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालकांनी मुलांवर करीअरबाबत आपल्या इच्छा लादू नयेत : कु. विधी पळसापुरे

पालकांनी मुलांवर करीअरबाबत आपल्या इच्छा लादू नयेत : कु. विधी पळसापुरे


पालकांनी मुलांवर करीअरबाबत आपल्या इच्छा लादू नयेत : कु. विधी पळसापुरे द.भा.जैन सभेच्या पदवीधर संघटनेचा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्


सांगली : करीअर म्हणजे केवळ इंजिनिअर, डॉक्टर वा अधिकारी होणे नव्हे. स्पर्धा परीक्षेत फक्त 1% विद्यार्थ्यांनाच यश मिळते म्हणून निराश न होता इतर मार्गांची निवड करून करीअर घडवावे. प्रत्येकामध्ये एखादा गुण असतोच त्या गुणाचा विकास साधून करीअर घडविण्याचे स्वातंत्र्य त्याला द्यावे. म्हणून पालकांनी आपल्या इच्छा लादू नयेत असे प्रतिपादन माझा करिअर गाईड फौंडेशनच्या संस्थापिका कु. विधी पळसापुरे यांनी केले. द.भा.जैन सभेच्या पदवीधर संघटनेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्याच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी द.भा.जैन सभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील होते. शेठ रा.ध.दावडा दि.जैन बोर्डिंगच्या स्व.लक्ष्मीबाई जिनगोंडा पाटील शांतिपीठ येथे हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. 


त्या पुढे म्हणाल्या, विद्यार्थी चौथी ते आठवीमध्येच त्यांच्यावर योग्य संस्कार व कौशल्ये रूजविण्याचा प्रयत्न करावा. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत असलेल्या क्रेडिट सिस्टीमचा पाल्यांच्या मूल्यमापनासाठी उपयोग होणार असून आवडीनुसार करीअर करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  व्यासपीठावर सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील, सहखजिनदार अरविंद मजलेकर, महिला महामंत्री सौ. कमल मिणचे, पदवीधरचे संस्थापक आर.पी.पाटील,  पदवीधरचे चेअरमन प्रा.ए.ए.मुडलगी, व्हा.चेअरमन प्रा.डी.डी.मंडपे, सेक्रेटरी प्रा. आप्पासोा मासुले, जॉ. सेक्रेटरी प्रा.बी.बी.शेंडगे उपस्थित होते. 

सुरूवातीला णमोकार महामंत्रानंतर प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. प्रा.डी.डी. मंडपे यांनी स्वागत केले. प्रा.ए.ए.मुडलगी यांनी प्रास्ताविकात पदवीधर संघटनेच्या स्थापनेचा उद्देश, विविधांगी उपक्रम व आर.पी.पाटील ॲकॅडमच्या स्पर्धा परीक्षांसंबंधी उपक्रमाचा आढावा घेतला. सेक्रेटरी प्रा.ए.ए.मासुले यांनी प्रमुख पाहुणे व सभा पदाधिकारी यांची ओळख करून दिली. चेअरमन रावसाहेब जि.पाटील यांचे अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सभेच्या 
 
शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेऊन पदवीधर संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 10 वी, 12 वी, तसेच नेट/सेट, पीएच्‌‍.डी., एम.पी.एस.सी. आदि विभागात यश संपादन केलेल्या महाराष्ट्र व कर्नाटकातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी गौरवार्थीच्यावतीने प्रातिनिधीक स्वरूपात प्रा.डॉ.श्रीदेवी राहुल नकाते यांनी मनोगत व्यक्त केले.  जौ. सेक्रेटरी प्रा.बी.बी.शेंडगे यांनी आभार मानले. 

सुत्रसंचालन निरीक्षक डॉ.जयपाल चौगुले व सदस्य प्रा.एम.के.घुमाई यांनी केले. कार्यक्रमास सभा, शाखांचे पदाधिकारी, पोपटलाल डोर्ले, प्रा.डॉ.एस.पी.पाटील, डॉ.एस.एन.पाटील, बी.अर.पाटील, डॉ.सौ.पी.एम.चौगुले, श्रीमती अनुपमा मुळे, धनचंद्र सकळे, सौ.धनवंती पाटील, प्रा.एस.डी.आकोळे, रावसाहेब हिंगलजे, एस.एन.पाटील, अशोक चौगुले, कल्लाप्पा गडकरी, सुभाष पळसापुरे, मनोज पाटील, प्रा.तेजस कुबळ यांच्याहस विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.