Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात मराठा आरक्षण बैठकीत गोंधळ

कोल्हापुरात मराठा आरक्षण बैठकीत गोंधळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात घेण्यात आलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत आज राडा झाला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत मराठा आरक्षण कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले.

त्यांना आवरताना पोलिसांबरोबरही त्यांची हुज्जत झाली.

अजित पवार यांच्या हस्ते आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाले. त्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही उपस्थित होते. सकल मराठा समाजाचे कोल्हापूर येथील कार्यकर्ते बाबा इंदुरीकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला बैठकीला बोलवण्यात आले होते. दरम्यान, मराठा आरक्षण यात्रेचे अध्यक्ष योगेश केदार आणि त्यांचे कार्यकर्तेही या बैठकीला पोहोचले, परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

मराठा आरक्षणाची बैठक केवळ कोल्हापूरसाठीच मर्यादित आहे का, असा सवाल करत आम्हालाही बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण तापले. अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, असा आग्रह धरत कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला.

लवकरच मुंबईत बैठक

अजित पवार यांनी यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्या बैठकीला मराठा समाजाच्या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.