Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपनं संभाजी भिडे नावाचा वळू सोडलायं; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

भाजपनं संभाजी भिडे नावाचा वळू सोडलायं; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

अमरावती: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमरावतीत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत कॉँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केले होते.

त्यांच्या या आरोपांना काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं संभाजी भिडे नावाचा वळू सोडला असल्याचं दिलीप एडतकर यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधत असताना दिलीप एडतकर म्हणाले, “मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे नावाचा वळू भाजपनं महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्यासाठी सोडला आहे.

भाजप खासदार अनिल बोंडे आणि शिवराय कुलकर्णी हे भाजप आणि संघाचे पाळीव नथुराम गोडसे आहे. त्या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना मारलं होतं आणि हे गोडसे महात्मा गांधीजींच्या विचारांना मारण्याचा प्रयत्न करत आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले, “अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकंदरीत भाजपची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चिंताजनक आहे.

2024 मध्ये देशात भाजपचा सुपडा साफ होणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपला राजकीय पोळी शेकता यावी म्हणून ते या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे.” दरम्यान, संभाजी भिडे  यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी भिडेंना नोटीस बजावली आहे. भिडे यांना अमरावती येथील राजापेठ पोलीस स्थानकात 08 दिवसात हजर राहण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.