सागंली: भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ठाकरे गटाकडून मारहाण
तासगाव भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी बोगस कामे करत आहेत. खासगी उमेदवार सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना रोज लुबाडत आहेत, असे आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक चंद्रकांत शिरढोणे, कर्मचारी दत्ता जगताप या दोघांना मारहाण केली. सदर प्रकार शुक्रवारी (दि.१८) दुपारी घडला. शुक्रवारी रात्रीपर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात याबाबतची कोणतीही नोंद झालेली नव्हती.
अधिकची माहिती अशी की, येथील दत्त माळ भागामध्ये प्रशासकीय इमारतीत भूमी अभिलेख कार्यालय आहे. या कार्यालयात मोजणी, नकाशे, जुने सातबारा, नोंदी यासह अन्य कामे होतात. कार्यालयात एकही अधिकारी वेळेवर उपस्थित नसतो. अनेकवेळा टेबल मोकळे पडलेले असतात. सामान्य नागरिकांना एका कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. अधिकारी, कर्मचारी लोकांना दाद घेत नाहीत. लोक कारभारास वैतागले आहेत, असे आरोप तालुक्याच्या विविध गावातून येणारे ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येते.शासकीय कागदपत्रे, मूळ नकाशे बोगस व्यक्तीच्या हातात दिल्याने संतापलेल्या माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांना धारेवर धरले. लोखंडे याने केलेल्या नकाशावर आपणच सह्या करत असल्याचे शिरढोणे यांनी कबूल केले. हा प्रकार पाहून माने यांनी शिरढोणे यांना मारहाण केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.